“भारत स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो. कोणत्या आधारावर आणि अटींवर बंद केलं युद्ध ते सांगा,” अशी मागणी शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊता यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत केली आहे. “अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी केली असं सांगण्यात येते हे चूक आहे. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प याचा सबंध काय? माणसं आमची मेली मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाराने करतात?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
“यूक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये मोदींनी जाहिरात केली होती की, पापाने वॉर रुका दिया. आता अमेरिकेच्या पापाने वॉर थांबवलं का?” असा खोचक टोला राऊतांनी लगावला. “‘पूर्ण बदला घेणार, पाकिस्तानचे तुकडे करणार,’ ही मोदींची भाषा होती. पाकिस्तानचे तुकडे कुठे गेले?” असा प्रश्न राऊतांनी विचारला. “भारताची जगामध्ये बेअब्रू झालेली आहे. “पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं आहे, आम्ही युद्ध जिंकलो. अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्र्यांना हे शोभत नाही,” असंही राऊत म्हणाले आहेत.