राज ठाकरे यांनी काल केलेल्या फेसबुक पोस्टवरून खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. शिवसेना शिंदेंची कशी होऊ शकते हे सांगणारे राज ठाकरे पहिले नेते होते असं राऊतांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे, अजित पवारांकडे चोरीचा माल असून तो कधीही जप्त होऊ शकतो असं टीकास्त्रही राऊतांनी सोडलं.एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला. अमित शहा यांनी दरोडा टाकून एकनाथ शिंदे यांच्या कडे दिला तेव्हा ही त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची कशी होऊ शकते असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता.