रायगडच्या पालकमंत्रिपदचा तिढा कायम आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पालकमंत्रिपदावर अजुनही अडून बसले आहेत. त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरेंना पाठींबा दिला आहे. तर गावगुंडाकडे पालकमंत्रिपद नको असं म्हणत भरत गोगावलेंना चिमटा काढला आहे.
ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आदिती तटकरे पालकमंत्रीपदासाठी सक्षम आहेत असं म्हणत गोगावलेंना विरोध केला आहे. रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गाव गुंडाकडे असता कामा नये असं म्हणत राऊतांनी गोगावलेंवर टीका केली आहे. तर यावर पालकमंत्री कोण हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील. संजय राऊत यांनी त्यात पडू नये, कोण गावगुंड हे जनताच ठरवेल असं गोगावले यांनी म्हटलं आहे.