ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सदरात औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे. तसंच लालकृष्ण आडवाणींची अवस्था पाहून शहाजहानची आठवण येत असल्याचंही म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी लिहिलं आहे की, औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. ही कबर उखडण्याची मागणी होते आहे. मात्र ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार आहे तो तैमूरलंग त्याच्या नावावरु एक फिल्मस्टार मुलाचं नाव तैमूर ठेवतो त्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. तैमूर तुम्हाला चालतो आहे. लालकृष्ण आडवाणी यांची अवस्था शहाजहान सारखीच झाली आहे. आडवाणी हे हिंदुत्ववाद, राम मंदिर या सगळ्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी हिंदुत्वाचं शिल्प उभं केलं पण त्यांना शहाजहान प्रमाणे एकांतवासात ठेवण्यात आलं आहे. हे पण या हिंदुत्ववाद्यांचा चालतं आहे. आमचे आडवाणी कुठे आहेत? त्यांना बंदिस्त का ठेवलं आहे? असे प्रश्न कबर खोदणाऱ्यांनी उपस्थित केले आहेत का? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.