मॉकड्रीलवरून संजय राऊत यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मॉकड्रीलची अंमलबजावणी उद्या करणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलेय.

संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानने किंवा दहशतवाद्यांनी आमच्या २७ लोकांचा बळी घेतला. त्या संदर्भात प्रतिकार किंवा बदला काय? हा प्रश्नच आहे. दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत. आपल्याला जपानने पाठिंबा दिला आहे. पुतीनने पाठिंबा दिला आहे, अशा चर्चा आहेत. उद्या जनतेचा युद्धसराव आहे. आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्धसराव अनेक देशांमध्ये होत असतो. विशेषतः ज्या देशांना सातत्याने युद्धाची भीती असते त्यांना युद्धसराव करावा लागतो. जनतेला त्यात सहभागी करून घ्यावे लागते. भारतामधील जनता तेवढी अज्ञानी नाही. १९७१ सालची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे. तेव्हा दळणवळणाची साधने देखील कमी होते. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं पण त्यापेक्षा मोठे युद्ध आपण लढलो ते म्हणजे कोरोनाचे युद्ध. भारताची जनता ही मानसिक दृष्ट्या मजबूत आहे.

मात्र या सगळ्या गोष्टीत तुम्ही जनतेला मानसिक दृष्ट्या अडकून ठेवले आहे. अनेक देशात आम्ही पाहिले आहे की, एखाद्या नागरिकांवर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाला की २४ तासात बदला घेतला जातो. आता आमचा युद्धसराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहात का? भोंगे वाजणार आहेत, ब्लॅक आऊट होणार आहे. महत्त्वाच्या गोष्टी झाकून ठेवल्या जातील. याची माहिती लोकांना वेगळ्या माध्यमातून दिले जाऊ शकते. जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसा आता युद्ध सरावात अजून एक दिवस घालवतील, असा हल्लाबोल त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here