वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण: साडी आणि पंखा उलगडणार मृत्यूच रहस्य!

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात पोलीस वैष्णवीच्या रुममधील दोन गोष्टींची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करणार आहे. या दोन गोष्टींच्या सहाय्याने वैष्णवीने स्वत:ला संपवलं की तिची हत्या करण्यात आली या प्रश्नाचा उलगडा होणार आहे. वैष्णवी तिच्या रुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र तिच्या पालकांनी तिची ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैष्णवीच्या शरीरावरील जखमांवरुनही हगवणे कुटुंबाने तिचा छळ केला, मारहाणीत तिचा मृत्यू झाला का अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. मात्र आता वैष्णवी ज्या साडीला लटकलेल्या अवस्थेत सापडली तीच साडी प्रकरणाचं गूढ उलगडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

वैष्णवीने ज्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली त्या पंख्याची तसेच साडीची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत म्हणजेच फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी होणार आहे. वैष्णवीचं वजन ७१ किलो होतं. त्यामुळेच ७१ किलो वजन पंख्याला पेलेलं जाऊ शकते का याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामधूनच वैष्णवीच्या आत्महत्येसंदर्भातील इतर शंकांना पूर्ण विराम मिळू शकतो किंवा नवीन काही माहिती समोर येऊ शकते अशी दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here