आता सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ऑनलाईन अर्ज भरा

मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध आहे.

श्रीगणेशोत्सव साजरा करताना मुंबईतील हजारो सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ हे सार्वजनिक किंवा खासगी जागेवर मंडप उभारतात. या सर्व श्रीगणेश मंडळांसाठी महानगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अवघ्या काही मिनिटांत श्रीगणेश मंडळांचा मंडप परवानगीचा आणि नूतनीकरणाचा अर्ज भरता येणार आहे. मंडळांनी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिस स्थानक, स्थानिक वाहतूक पोलिस यांच्याकडे ना-हरकत प्राप्त करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही. ही सर्व प्रक्रिया महानगरपालिकेच्या विभाग स्तरावर सहायक आयुक्त व परिमंडळीय स्तरावरील उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. त्यामुळे मंडळांचा खूप वेळ वाचणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here