बॉलिवूड अभिनेता सोहेल खाननं 1998 मध्ये सीमा सजदेहसोबत लग्न केलं. पण 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतलाय. आता सीमानं तिच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे की ती काय विचार करते. इतकंच नाही तर त्या सगळ्याचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला. सीमानं सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर काहीही विचार न करणं आणि प्रत्येक गोष्टीसाठी समोरच्याला जबाबदार ठरवनं हे खूप सोपं असतं. सीमानं सांगितलं की लग्नानंतर काही प्रमाणात ती त्याच्यावर अवलंबून होती आणि घटस्फोटानंतर ती स्वावलंबी व्हावं लागलं.
त्यामुळे हेल्थ इंश्योरंसपासून सगळ्या गोष्टी तिला सांभाळाव्या लागल्या. सीमानं ‘द हीलिंग सर्किल’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की घटस्फोटा हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला होता. सीमानं सांगितलं की घटस्फोटाच्या दरम्यान, अनेक गोष्टींवर तिनं स्वत: काम केलं आणि विभक्त झाल्यानंतरही अनेक गोष्टी या स्वत: कराव्या लागतात. त्यात एक सर्जरीनंतर हेल्थ इन्शोरन्सशी संबंधीत सगळ्या गोष्टी देखील होत्या. या सगळ्या अनुभवांनंतर तिला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यास शिकवलं. सीमानं सांगितलं की आज तिला वाटतं की आधीच्या तुलनेत ती आता चांगली झाली आहे आणि खासगी लेव्हलवर ती आता सावरली आहे.