सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. या बातमीमुळं शासकीय अख्तयारित येणाऱ्या विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची निराशा होऊ शकते. कारण, आहे ते म्हणजे पगाराच्या आकड्यात होणारी घट.
मागील काही दिवसांपासून महागाई भत्ता (DA) आणि DR मध्ये किमान २ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यानंतर हा आकडा ५५ टक्क्यांवर पोहोचला. पण, आता २०२५ मधील पहिल्या तीन महिन्यांतील महागाई दरात झालेली घट पाहता पुढील महागाई भत्तेवाढीचा आकडा २ टक्के किंवा त्याहून कमीसुद्धा असू शकतो. ज्यामुळं जुलै- डिसेंबर २०२५ दरम्यान चांगल्या महागाई भत्तेवाढीची अपेक्षा बाळगणाऱ्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे.