वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची रिक्षावाल्याकडून हत्या

बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा निर्घुण खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या महिलेला दररोज बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकास अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या ५१ वर्षीय आरोपीचे नाव नितीन चंद्रकांत पंडित असे आहे. तो पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आहे. हत्या झालेल्या ४० वर्षीय महिलेचे नाव श्यामली असून ती धायरी येथील रायकर मळा परिसरात राहणारी होती. शनिवारी आरोपीने ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटना समोर आल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here