१८ वर्षीय विद्यार्थिनीचं सेक्सटॉर्शन!

मुंबईत १८ वर्षाच्या तरुणीचं सेक्सटॉर्शन करत तिच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. तरुणी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. वेब सीरिजची ऑफर देत तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यात आलं. यानंतर तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. तसंच तिचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो पाठवत ते सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देण्यात आली. तरुणीने याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

११ जूनला मुलीच्या मोबाईलवर वेब सीरिजची ऑफर देणारा मेसेज आला होता. या वेबसिरीजचे आमिष दाखवून तिचे कामाचे व्हिडिओ मागवण्यात आले. तरुणीने आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूबची लिंक पाठवली. आरोपींनी तिला दोन दिवसात वेब सीरिजचं काम सुरु करण्याचं आश्वासन दिलं. तसंच शिवम अगरवाल मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं. यानंतर त्यांनी तिला शिवमशी ओळख वाढव असा सल्ला दिला. ११ जूनला शिवम इंस्टाग्रामवरुन तिच्या संपर्कात आला.

यानंतर आरोपींनी तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. भावेशने तिला विमानाच्या तिकीटाचे पैसे पाठवण्यास सांगितले. तरुणीने सुरुवातीला ५ हजार आणि नंतर ४ हजार असे ९ हजार पाठवले. भावेशने तरुणीला १३ जूनला शिवमसोबत चित्रपट पाहण्यास पाठवलं होतं.

चित्रपट पाहून झाल्यानंतर तरुणीला भावेशने फोन केला. शिवम घरी आला नसून, त्याच्याशी संपर्क साध, भेट असं तो सांगत होता. पण तरुणीने आपण बोलणार नाही सांगत नंबर ब्लॉक केला. यानंतर १५ जूनला भावेशने रुपाकडे ४० हजारांची मागणी केली. अन्यथा अर्धनग्न असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करेन अशी धमकी दिली. तिने नंबर ब्लॉक केल्यानंतर तिच्या बहिणीच्या क्रमांकावर हा मेसेज पाठवण्यात आला. अखेर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here