पहलगाम हल्ल्याबाबत शरद पोंक्षे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.पाकिस्तानच्या हल्ल्यावर शरद पोंक्षे म्हणाले, ‘आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे. आपण सगळ्यांनी व्हिडीओ पाहिले आहे. ज्यांच्या घरातील लोकांना मारलं आहे त्यांनी सांगितलं की धर्म विचारला. पण जर कोणी विचारला नाही असं कोण म्हणतं असतील तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ. पाकिस्तानशी सगळे संबंध तोडले पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे.
पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हायला पाहिजे. आपण युद्ध टाळण्यासाठी खूप संधी दिली आहे. आता पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याची वेळ आली आहे. कोण कलाकार यावर बोलत नाहीत याच्याशी मला देणंघेणं नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे. आता इतिहासातील सगळं उट्ट काढण्याची संधी आली आहे. आता नकाशावरून सगळं संपवूनच टाकूया. मोदींवर माझा खूप विश्वास आहे ते सर्व करून दाखवतात जास्त बोलत नाहीत. एकदा लचका कापावा लागतो, ती वेळ आता आली आहे. जे बांधव या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल असं पाऊल उचलले जाईल.’