अँटी एजिंग औषध घेत होती शेफाली जरीवाला! पोलिस तपासात खुलासा

शेफाली जरीवाला मृत्यूप्रकरणी पोलीस तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये शेफाली मागील अनेक महिन्यांपासून अँटी एजिंग औषधं घेत होती. २७ जूनला घरी पूजा असल्याने शेफालीने उपवास ठेवला होता. मात्र यानंतरही तिने दुपारी अँटी एजिंग औषध इंजेक्ट केलं होतं. शेफालीने ७ ते ८ वर्षांपूर्वी एका डॉक्टरकडून अँटी एजिंग आणि विटॅमिनच्या औषधाचा सल्ला घेतला होता. यानंतर ती अनेक महिन्यांपासून ही औषधं घेत होती.

आतापर्यंतच्या पोलीस तपासात ह्रदयविकाराचा झटका आल्यानेच शेफालीचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. रात्री अचानक १० ते ११ दरम्यान तिचं शऱीर अचानक थरथरु लागलं आणि ती खाली पडली. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हे सर्व घडलं त्यावेळी घऱात शेफालीसह पती पराग आणि शेफालीची आई यांच्यासह काही अन्य लोक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here