शिंदे शिवसेना विरुद्ध नितेश राणे! “बाप” या शब्दावरून वाद

आजच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठकित “बाप” विषयावरुन वाद झाला. भाजपा आमदार नितेश राणेंच्या विधानावरुन शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी जाहीर केली आहे. नितेश राणेंनी धाराशीव येथे केलेल्या वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी बैठकीत आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच त्यांनी नितेश राणे यांच्या विधानासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्याशी चर्चा करत बाप काढणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तुमच्या मनात काहीही असलं तरी असं बोलणं योग्य नाही हे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here