बीडमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे. पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाने गोळीबारी केला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. चोरीच्या उद्देशाने काही तरुण पवनचक्की परिसरात शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला आहे. नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली.
बीडच्या लिंबागणेशच्या महाजनवाडी परिसरात गुरुवारी रात्री पवनचक्की कंपनीच्या परिसरात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृतदेह परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही.
बीडच्या लिंबागणेशच्या महाजनवाडी परिसरात गुरुवारी रात्री पवनचक्की कंपनीच्या परिसरात चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृतदेह परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.