काही जण म्हणत होते की ऑपरेशन सिंदूर एक तमाशा आहे. मला त्यांना विचारायचेय की 2008मध्ये मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री एका बॉलिवूडच्या दिग्दर्शकाला घेऊन ताजमध्ये गेले. त्यानंतर त्यांच्याच गृहमंत्र्यांनी बडे बडे शहरोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है असे स्पष्टीकरण दिले होते. त्यांचे गृहमंत्री तीन तीन वेळा कपडे बदलायचे. हा तमाशा तेव्हा व्हायचा. मात्र आज निर्णय लगेचच होतो, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘सर्वच विरोधक इंटेलिजन्स फेल्युअरबाबत बोलताय, दहशतवादी कुठून व कसे आले? हे विचारताहेत. त्या दहशतवाद्यांचे काय झाले, असे सवाल करताहेत. मला त्यांना प्रश्न विचारायचा 2006मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले ते आरोपी कुठून आले. परवाच मुंबई उच्च न्यायालयाने 2006 वेळी जेवहा यांचे केंद्रात व राज्यात सरकार होतं. त्या हल्ल्यात 127 लोक मारले गेले. ज्या 127 लोकांना ज्यांनी मारले त्यांना हायकोर्टाने निर्दोष सोडले. म्हणजे चौकशीदेखील यांचं सरकार नीट करु शकलं नाही. याला जबाबदार कोण? आणि हे विचारताहेत पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले. 2006च्या स्फोटातील पीडितांना न्याय कधी मिळणार?,’ असा सवाल शिंदे यांनी केला आहे.