सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर

सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्थानांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दोन वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी नाशिकमध्ये असतानाच या तारखा जाहीर झाल्या आहेत. या सिंहस्थ मेळाव्यासंदर्भात काही मतभेद असले तरी ते सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यासाठी आज बैठक पार पडत असून त्याचदरम्यान अमृतस्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा हा खरा नाशिकचा की त्रंबकेश्वरचा याबाबत त्र्यंबकेश्वरच्या शैव संप्रदायाने सवाल उपस्थित केले होते. वैष्णव आणि शैव संप्रदायातील वाद टाळण्यासाठी प्रशासनाने आता नाशिक आणि त्रंबकेश्वर ही दोन्ही नावं टाळून केवळ सिंहस्थ कुंभमेळा २०२७ असे केले आहे. या वादामुळे भाविकांच्या येण्यावर मोठा परिणाम झाला असता त्यातून श्रद्धा जाण्याची भीती होती. त्यामुळे सुवर्ण मध्य शोधत प्रशासनांन आता हा वाद सोडवला आहे. मात्र आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शैव साधू बैठकीत साधू महंत याबाबत काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असं असतानाच कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या अमृतस्नान तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर अमृतास्नानाच्या तारखा

पहिले अमृतस्नान – २ ऑगस्ट २०२७

द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७

तृतीय अमृतस्नान – १२ सप्टेंबर २०२७

नाशिक कुंभ अमृतस्नान तारखा

३१ ऑक्टोबर २०२६ ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात होईल.

पहिले अमृतस्नान -२ ऑगस्ट २०२७

द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट  २०२७

तृतीय अमृतस्नान – ११ सप्टेंबर २०२७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here