अनेकदा सेलिब्रिटीजला ‘आपके खुबसुरती का राज क्या है’ हा प्रश्न हमखास विचारला जातोच. या खुबसुरती मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो सुंदर, मुलायम, निरोगी, चमकदार त्वचा. आपली त्वचा सुंदर, चमकदार, नितळ असावी असं प्रत्येकाला वाटत असत. चांद सा रोशन चेहरा असं वर्णनही केलं आहे. पण चंद्रा सारख्या चेहऱ्यावर एखादा पिंपल जरी आला तरी महिला वर्गाचा जीव वरखाली होतो. तो पिंपल घालवण्यासाठी आपण शक्य तेवढे सगळे प्रयत्न करतो. चेहरा चमकदार आणि सुंदर दिसावा, यासाठी बहुतांश जणी ब्युटी पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटची मदत घेतात. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर केला जातो. यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
कोणत्याही केमिकलचा मारा न करता आपण सुंदर, निरोगी त्वचा ठेवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला रोज थोडा वेळ स्वतःसाठी आणि स्किन केअर रूटीन साठी काढणं गरजेचं आहे.. काही गोष्टी रोज नियमाने, न कंटाळता केल्या तर महागड्या ब्युटी ट्रीटमेंटची गरजच भासणार नाही. त्वचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक भाग आहे. हल्ली बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, ताणतणाव, मेकअपचा अतिवापर यामुळे त्वचेच्या समस्याही वाढत आहेत. सातत्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणं, मुरुमं, त्वचा काळी पडणं, काळे डाग, त्वचा कोरडी होणं या समस्या अनेकदा जाणवतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक महिला धडपड करत असते. म्हणूनच आपल्या रोजच्या दिनचर्येत स्किन केअर रूटीन असणं आवश्यक आहे..रोज थोडा वेळ स्किन केअर साठी काढला तर तुमची त्वचा निरोगी, नितळ आणि तजेलदार राहील .
त्वचेची देखभाल केवळ सकाळीच नाही तर रात्री झोपण्यापूर्वी करणंही गरजेचं आहे. कारण दिवसभर आपण उन्हात बाहेर असतो, दिवसभर चेहऱ्यावर बाहेरचे धूलिकण,बॅक्टेरिया, घाण त्वचेवर बसते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. ती घाण त्वचेवरून वेळच्या वेळी काढली नाही तर त्वचा खराब, निस्तेज होते. म्हणून सकाळ प्रमाणे रात्रीचं स्किन केअर रूटीनही महत्त्वाचं आहे. बाहेरच्या प्रदूषित वातावरणामुळे त्वचा अधिक रुक्ष होत जाते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी त्वचा स्वच्छ केली तर त्वचेवर चिकटून बसलेली घाण निघून जाते. आणि सकाळी पुन्हा एकदा आपली त्वचा आपल्याला तजेलदार, चमकदार दिसू शकते.

त्वचा चांगली, निरोगी ठेवण्यासाठी रोज रात्री तुमचा चेहरा स्वच्छ केला पाहिजे. दररोज रात्री न चुकता चेहरा स्वच्छ करणं हे महत्त्वाचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा कसा स्वच्छ करायचा याच्या काही सोप्या टीप्स पाहुयात
- सर्वात आधी तुमच्या त्वचेनुसार योग्य क्लिन्झर निवडा
कोमट पाणी घ्या, स्वच्छ मऊ कापड आणि चेहरा पुसण्यासाठी टॉवेल घ्या. - तुमचे हात स्वच्छ धुवा
तुमच्या चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी किंवा प्रॉडक्ट हातात घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे..जेणेकरून तुमच्या हाताला असलेले बॅक्टेरिया चेहऱ्यावर जाणार नाही. - मेकअप पूर्ण काढा
मेकअप रिमूव्हरने पूर्ण मेकअप काढा. - चेहरा ओला करा
तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुमचा चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवा किंवा चेहऱ्यावर हलक्या हाताने पाणी शिंपडावे..शक्यतो गरम पाणी वापरू नये. कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. - क्लिन्झर लावा
त्यानंतर तुम्ही निवडलेलं क्लिन्झर घ्या आणि ते तुमच्या बोटांच्या टोकाला लावा. गोलाकार पद्धतीने हळुवार आपल्या चेहऱ्यावर मसाज करा. जिथे धूळ तेल आणि मेकअप जमा होतो अशा ठिकाणी म्हणजे कपाळ, हनुवटी, नाक त्या भागावर जास्त लक्ष द्या - 20 सेकंद मसाज करा
कमीत कमी 20 सेकंद तरी मसाज करा. यामुळे त्वचेवरील अशुद्धता नष्ट होण्यास मदत होते आणि त्वचा योग्यरित्या स्वच्छ होते. मसाज करताना हळुवारपणे मसाज करा जोरात स्क्रब करणे टाळा. - नखं स्वच्छ धुवा
क्लिन्झर लावून झाल्यानंतर हात आणि नको पूर्णपणे कोमट पाण्याने धुवा. आपल्या त्वचेवर काहीही शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या. - चेहरा कोरडा करा
स्वच्छ टॉवेलने तुमचा चेहरा पुसून घ्या. टॉवेलने चेहरा जोरजोरात पुसू नका त्याने त्वचेला त्रास होऊ शकतो. - मानेपर्यंत मसाज करा
चेहऱ्याला मसाज करताना मानेपर्यंत स्वच्छ करा कारण या भागातही घाण आणि तेल जमा होते. - मॉइश्चरायझरचा वापर करा
मॉइश्चरायझरचा वापर ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. मॉइश्चरायझर त्वचेची आर्द्रता लॉक करण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हाही आपण झोपतो तेव्हा आपल्या त्वचेतून आर्द्रता गायब होऊ लागते, त्या ओलाव्याला लॉक करण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर केला जातो. - चेहऱ्याची काळजी घेत असताना ओठांकडे सुद्धा लक्ष द्या. ओठांना सुद्धा घाण आणि प्रदूषणाचा फटका बसण्याची शक्यता असते. चेहरा धुताना ओठ सुद्धा स्वच्छ धुवा आणि झोपण्यापूर्वी ओठांना लिपबाम लावा.
- डोळ्यांना मसाज
चेहऱ्यावरील एक महत्त्वाचा भाग म्हणजे डोळे. अनेकदा अपुरी झोप, ताणतणाव, मोबाईलचा अतिवापर यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांना आइस्क्रीम लावून झोपणे गरजेचं आहे. हलकी आणि डोळ्यांना आराम देणारी आयक्रीम निवडा. - त्वचेनुसार स्किन केअर रुटीन ठरवा
काहींची त्वचा ऑईली असते तर काहींची कोरडी असते त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्किन केअर रुटीन ठरवा. कोणतेही प्रॉडक्ट वापरताना आपल्या त्वचेला ते सूट होतं आहे की नाही याचा विचार करा.