अपुऱ्या झोपेमुळे मिळू शकतं या आजारांना निमंत्रण

अपूर्ण झोप आजारपणांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते. ज्यामुळे हृदयरोग, किडनी फेल या आणि अशा कैक गंभीर आजारांचा शरीराला धोका असतो.

झोपेचं सरासरी प्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या धर्तीवर करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार गाढ झोपेत असतानाही मध्येच जाग येणं, सतत झोपेच्या वेळा बदलत राहणं अशा सवयींचा थेट संबंध पार्किन्सन्स, टाईप 2 डायबिटीस, किडनी फेल, अशक्तपणा, गँगरिन अशा 172 आजारांशी जोडला गेला आहे. अपुऱ्या झोपेमुळं हे आजार होण्याचा धोका दुपटीनं बळावण्याचा धोका वाढतो.

सुदृढ आरोग्यासाठी साधारण 7 ते 9 तासांची झोप आवश्यकच आहे. मात्र सोबतच चांगली आणि आरोग्यदायी जीवनशैली, आरोग्यास पूरक अशा सवयी या साऱ्याचा परिणामही झोप आणि आजारपणाच्या या समीकरणावर परिणाम करताना दिसतो. प्रत्येक व्यक्तीनुरूप झोपेच्या वेळी, झोपेचं प्रमाण विभिन्न असून, या साऱ्यामध्ये सवयींचं सातत्य, झोपेच्या निर्धारित वेळा आणि सरकतेशेवटी पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here