सोनाली बेंद्रे हिचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जोडले गेले होते. अलिकडेच राज ठाकरे यांच्यासोबतचा तिचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोनाली वर्षानुवर्षे राज ठाकरे यांना आवडत होती. ९० च्या दशकात दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. आता सोनालीने त्या व्हायरल व्हिडिओ आणि दाव्यावर पहिल्यांचा मौन सोडले आहे. सोनाली या सगळ्यावर अतिशय मोकळेपणाने बोलताना दिसत आहे.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंसोबत असलेल्या अफेअरच्या अफवांना फेटाळून लावले आहे. सोनाली म्हणते- ‘खरोखरंच… मला यावर शंका आहे?’ व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना ती म्हणते की, मी माझ्या बहिणीशी बोलत होते, जी त्यावेळी तिथे होती. मुलाखतीत सोनाली अशा अफेअर्सच्या गॉसिपवरही टीका करते. ती म्हणते- ‘मला माहित नाही. मला वाटते की लोक असे बोलतात तेव्हा ते चांगले दिसत नाही. त्यात कुटुंब आणि लोक देखील समाविष्ट आहेत.’
सोनाली राज यांच्यासोबत असलेले नाते स्पष्ट करते आणि म्हणते की, तिचे आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबाचे दशकांपूर्वीचे नाते आहे. तिचा मेहुणा एक क्रिकेटपटू आहे आणि तो राज यांच्या चुलत बहिणीच्या पतीसोबत क्रिकेट खेळतो. दोघेही नेहमीच एकत्र क्रिकेट खेळायचे. दुसरे म्हणजे, तिच्या बहिणीची सासू रामनारायण रुईया कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य विभागाची प्रमुख होत्या, जिथून सोनालीने शिक्षण घेतलं आहे. अशा परिस्थितीत, सर्वजण एकमेकांना आधीपासून ओळखत होते.सोनाली म्हणाली की, राज यांच्याशी तिचे नाते फक्त एवढेच होते की राज यांची पत्नी शर्मिला, तिची आई आणि काकू या चांगल्या मैत्रिणी होत्या.