अलीकडेच पुन्हा एकदा सूरज पंचोलीने सलमान खानबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. इंस्टेंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत सूरजने म्हटले की, सलमानच्या दयाळूपणा आणि उदारतेमुळे तो इंडस्ट्रीतील सर्वात आदरणीय सेलिब्रिटींपैकी एक बनला आहे.
यावेळी सूरजने असेही उघड केले की सलमानचे घर सर्वांसाठी खुले होते. पूर्वी त्याचे घर खरोखरच सर्वांसाठी खुले होते. दाराला कुलूप होते, पण ते कधीही वापरले जात नव्हते.जर तुम्हाला त्याच्या घरात काही खायचे असेल किंवा फ्रिजमधील कोणतीही गोष्ट घेयची असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इतकच नाही तर तुम्ही सलमान खानचे प्रोटीन शेक किंवा विटामिन देखील घेऊ शकता. कोणी काहीच बोलणार नाही. सूरजने सलमानच्या आदरातिथ्य शैलीचे कौतुक केले.
पुढे म्हणाला की, सलमानच्या घरात कोणताही पाहुणा कधीही बाहेरील व्यक्तीसारखा वाटत नाही. अनेकदा असे व्हायचे की सलमान सकाळी उठायचा तेव्हा घरात कोणालाही पाहिलं तर तो विचारायचा की, आरे तुला आला आहे, जेवण केलं का? त्यानंतर कोणालाही त्रास न देता तो त्यांच्या कामात व्यस्त राहायचा. सलमान खानचे घर खरोखरच खूप लहान आहे.