कल्याण–बदलापूर मार्गावर विशेष ब्लॉक! गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

कल्याणकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डर डि-लॉचिंगसाठी शनिवारी, २९ मार्च रोजी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत लोकल वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच, या कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा देखील बंद राहणार आहे.

ब्लॉकमुळे शनिवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येणार आहेत. यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे.

११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस
१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस
१११४० होसपेट-सीएसएमटी एक्सप्रेस
२२१५८ चेन्नई-सीएसएमटी एक्सप्रेस

याशिवाय, काही मेल-एक्सप्रेस गाड्यांना ठाणे आणि कल्याण स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

२२१७८ सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस पहाटे ४.१० ते ४.३० वाजेपर्यंत वांगणी स्थानकात थांबेल.
११०२२ तिरुनेलवेली-दादर एक्सप्रेस पहाटे ४.१७ ते ४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्थानकात थांबेल.

विशेष ब्लॉकमुळे लोकल सेवेतही बदल करण्यात आले आहेत:

रात्री ११.१३ – परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत धावेल.
रात्री ११.५१ – सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.
रात्री १२.१२ – सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.
मध्यरात्री २.३० – कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून पहाटे ३.१० वाजता सुटेल.
पहाटे ४.१० – कर्जत-सीएसएमटी ही विशेष लोकल म्हणून चालवली जाईल.

प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here