कुणाल कामराबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

कुणाल कामराच्या गाण्यावरून सुरु झालेल्या वादावर आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार, बँक खात्याचीही चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. मंत्री योगेश कदम यांनी सभागृहात बोलताना ही माहिती दिली आहे.

“सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींवर अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील तर याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. अजिबात कोणाला सोडलं जाणार नाही. अशा प्रकारची स्टॅण्डअप कॉमेडी आम्ही चालू देणार नाहीत. कुणाल कामराचा बोलवता धनी कोण आहे? कारण घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे. काही ठराविक ट्वीट केले गेले आहेत. सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेता कुणाल कामराचे सीडीआर तपासले जातील, सर्व कॉल रेकॉर्ड तपासले जातील. बँक खात्याची चौकशी केली जाईल, याचा सुत्रधार कोण? आणि असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल”, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here