राज्यातील मद्यविक्रीमुळे महसुलात वाढ होणार!

मागील ५० वर्षे मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांना असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठविली जाणार आहे. राज्यात नव्याने ३२८ मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत. दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मद्य परवान्यांवरून अजित पवारांवर आरोप केला आहे.

दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. कणखर, दगडांच्या देशाला बेवड्यांचा देशा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप करत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसंच किती मंत्र्यांना मद्य परवाने मिळतात ते बघाच असंही राऊतांनी यावेळी म्हटल आहे. तर, विधिमंडळाला विश्वासात घेऊन परवाने देण्याचा निर्णय झाल्याचं अजित पवारांकडून सांगण्यात आले.

अजितदादांचे पुत्र जय पवार या व्यवयासात असताना समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच सोपवणे यातून व्यावसायिक हितसंबंधांच्या संघर्षाच्या मुद्दा समोर आलाय. दारूच्या परवान्यांचा जय पवारांना फायदा होणार असल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. तर, पुराव्या द्या, तपास करून कारवाई करणार असल्याचं प्रत्युत्तर अजित पवारांकडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here