राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

एका राजकीय नेत्याकडून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राज्यातील 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा हा दावा आहे. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे त्याने सांगितले. यासंबंधीच्या व्हिडिओबाबतही त्याने माहीती दिली आहे.

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्याने कोणीही अधिकारी आपल्या हनीट्रॅपबाबत समोर येत नसल्याने हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाशिकसह मुंबई, पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याच काळात ही खळबळजनक माहिती समोर आल्याने आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आगामी काळात याबाबत नवी माहिती समोर येणार का, हेदेखील बघावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here