अभिनेता सुनील शेट्टी एका वादग्रस्त विधानामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने एका मुलाखतीत पती-पत्नीमधील समझदारी आणि जबाबदाऱ्या यावर भाष्य केलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं की, जर नवरा करिअर घडवण्यात व्यस्त असेल तर पत्नीने मुलांची जबाबदारी घ्यावी. त्याच्या या विधानानंतर सध्या सोशल मीडियावर लोक त्याच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.
तो म्हणाला की, आजकालच्या तरुणांमध्ये संयम उरलेला नाही. विवाह काही काळानंतर एक समझोता बनतो. जिथे एकमेकांना समजून घेत एकमेकांसाठी जगावं लागतं. मुलं झाल्यानंतर पत्नीने समजून घ्यावं लागतं की पती करिअरकडे लक्ष देईल आणि अशा वेळी तिने घरी मुलांची जबाबदारी घ्यावी.
मात्र, सुनील शेट्टी हे वक्तव्य ऐकून लोक त्याच्यावर भडकले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव केलाय.