वॉशिंग्टन : आठ महिन्यांपासून अवकाशात अडकून पडलेली भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर १९ मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन कॅप्सूलमधून ते दोघे परततील.
केवळ आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर रवाना झालेल्या सुनीता आणि बूच यांच्या परतीच्या मार्गात प्रचंड अडथळे आले, बोइंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून ५ जून २०२४ रोजी स्थानकावर ते रवाना झालेले. तेव्हापासून दोघे अवकाशात अडकून पडले आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.
सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील.
हे अवकाश स्थानक पृथ्वीपासून जवळपास ४०० किमी दूर आहे. वातावरणात प्रवेशानंतर जमिनीवर उतरण्यास ०३