अंडाशयाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे काय?

ओव्हेरियन(अंडाशय) कॅन्सर महिलांच्या अंडाशयात होतो. अंडाशय हे स्त्रीयांच्या प्रजनन अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव आहे जिथे अंडी (स्त्रीबीज) तयार होतात. बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यात या अंडीशयाच्या कर्करोगाचे निदान होत नाही. वांरवार पोट फुगणे, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल ही होणं ही या कॅन्सरची लक्षणं आहेत. याबाबत जागरूकता आणि वेळीच तपासणी हे भविष्यातील.परिणाम सुधारण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी गरजेचे आहे.

ओव्हरियन, स्तन किंवा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण अनुवंशिकता असते. जर सुरुवातीच्या टप्प्यात याचे निदान झाले तर, त्यावर मात करणे शक्य आहे. दुर्दैवाने पोट फुगणे, ओटीपोटात वेदना किंवा आतड्यांच्या हलचालींमध्ये बदल यासारख्या लक्षणांमुळे अनेक प्रकरणांमध्ये निदानास उशीर होतो व शेवटच्या टप्प्यात निदान होते. या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here