अमेरिकेतून भारतात आणलेला मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा सध्या १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत आहे. त्याच्या विरोधात भारतात खटला सुरू झाल्याने तो तणावाखाली दिसत आहे. दरम्यान त्याने त्याच्या वकिलाला या खटल्यासंदर्भात एक प्रश्न विचारला आहे.
पटियाला हाऊस कोर्टात हजर होताना तहव्वुर राणाने त्यांच्या वकिलाला, “हा खटला एका वर्षात संपेल का?” असा प्रश्न केला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणा भारतातील ट्रायलमुळे तणावात असून या प्रक्रियेसंदर्भात प्रश्न विचारत आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर, राणाने न्यायालयाकडे कारागृहात कुराणाची प्रत मिळावी, अशी मागणी केली. त्याची ही मागणी मान्य करत न्यायालयाने NIA ला राणासाठी कुराण उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला.
याशिवाय, पटियाला हाऊस कोर्टाच्या NIA विशेष न्यायालयाने राणाला त्याच्या वकिलांना भेटण्याची परवानगीही दिली. आता राणाचे वकील सोमवारी NIA कार्यालयात त्याची भेट घेतील.