सध्या बॉलिवूडमध्ये तमन्ना भाटिया आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या मैत्रीची चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावरील दोघींच्या पोस्टवरुन ही मैत्री किती घट्ट आहे हे वारंवार दिसत असतं. त्या दोघी मैत्रिणी कशा झाल्या यासह दोघींच्या वयामधील अंतर अनेकांच्या भुवया उंचावणारं असतं.
नुकतंच तमन्नाने या मैत्रीबद्दल अनेक गुपितं उघड केली आहेत. राशासह आपली मैत्री कशी सुरु झाली आणि वयाचं अंतर यावर बोलताना तमन्नाने सांगितलं की, “राशाने नुकतीच आपल्या करिअरची सुरुवात केली असून, माझी फार आधी तिच्याशी भेट झाली. आम्ही एका पार्टीत एकमेकींना भेटलो आणि डान्स सुरु केला. त्यानंतर आम्ही नेहमी संपर्कात राहिलो. आमच्या वयात खूप मोठं अंतर आहे. पण याचा काही फरक पडत नाही. शेवटी तुम्ही जे आहात आणि असणारं नातं किती घट्ट आहे हे महत्त्वाचं असतं”.