मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला संसर्ग होणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसकोर्सिस संसर्गाविषयी आता धोक्याचा इशारा दिला आहे. या आजाराचा संसर्ग झाल्यास मेंदूत सिस्टस म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
न्यूरोसिस्टीसकोर्सिस हा टेनिया सोलीयम म्हणजेच डुकराच्या टेपवर्ममुळं होतो. ह्याचा संसर्ग थेट मेंदूत होतो. या आजाराची लागण अस्वच्छतेमुळं, डुकराच्या मांसाचे सेवन होत असलेल्या ठिकाणी या आजाराचा संसर्ग होतो. कमी शिजवलेले मांस, व्यवस्थित न धुतलेल्या भाज्या हे टेपवर्क अळ्यांचे स्थान आहे. असे पदार्थ खाल्ल्याने परजीवी खाण्यामार्फत मेंदूमध्ये पसरतात ज्यामुळं मेंदूत गाठी तयार होतात.