मराठमोळा क्रिकेटपटू करणार भाजपात प्रवेश! मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश!

टीम इंडियाचा माजी खेळाडू केदार जाधव राजकारणात प्रवेश करणार आहे. आज दुपारी ३ वाजता मुंबईत भाजप कार्यालयात प्रवेश करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. केदार जाधवने यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची भेट घेतली होती, त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्याने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

केदार जाधव नव्या इनिंगला सुरुवात करतोय. क्रिकेटनंतर आता राजकारणाच्या मैदानात उतरण्यासाठी केदार जाधव तयार आहे.
वयाच्या ३९ व्या वर्षीच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होता. केदारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाकडून त्याने वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्त्व केले होते. केदारची पुण्यातील धोनीसोबतची मॅच आजही सर्वांच्या आठवणीत आहे, केदारने शतकी खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आज दुपारी मुंबईमध्ये तीन वाजता भाजप कार्यालयामध्ये प्रवेश करणार आहे. केदारच्या पक्षप्रवेशासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रेशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here