भारताच्या शेजारील थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे. कंबोडियाने थायलंडवर रॉकेट आणि तोफांचा मारा केला आहे. थायलंडच्या सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी F-16 जेट विमानांचा वापर केला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा वादावरून मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तणावाचं गुरुवारी संघर्षात रूपांतर झालं. या प्राथमिक संघर्षामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एका मुलासह किमान नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
थायलंडमधील सुरिन आणि कंबोडियातील ओडर मीन्चे प्रदेशाला लागून असलेल्या सीमेवरील दोन मंदिरांजवळ ही लढाई सुरू झाली. दोन्ही देश समोरच्या पक्षाकडून संघर्षाला सुरूवात झाल्याचा दावा करत आहेत.