रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं आणि यामागे आपल्या रोजच्या वापरातलं काही हेल्दी वाटणारे तेलही असू शकतात. आपल्याला वाटतं की ऑर्गेनिक किंवा महागडं तेल म्हणजे आरोग्यासाठी चांगलं. पण संशोधनातून असं समोर आलंय की काही तेलं आपल्या हृदयासाठी खूपच हानिकारक असतात. त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं आहे.
या ४ प्रकारच्या तेलांपासून राहा दूर
मार्जरीनमार्जरीन
हे ट्रान्स फॅट्सचं मोठं स्रोत आहे. याचा जास्त वापर केल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ शकतो. काही देशांनी हे तेल बंद केलं असलं तरी काही ठिकाणी अजूनही ते मिळतं.
कॉर्न तेल (मका तेल)कॉर्न तेलात ओमेगा-6 फॅट्स खूप जास्त असतात. याचा अती वापर केल्यानं शरीरात सतत सूज राहू शकते. त्यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. तसंच या तेलात ओमेगा-3 नसल्यामुळे ते हृदयासाठी फायदेशीर मानलं जात नाही.
नारळ तेल
बऱ्याच लोकांना वाटतं की नारळ तेल आरोग्यदायी असतं. पण संशोधन सांगतं की यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स खूप असतात, जे ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ वाढवतात. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि WHO दोघंही सांगतात की सॅच्युरेटेड फॅट्सचा वापर मर्यादित ठेवावा.
वारंवार गरम केलेलं तेल
कोणतंही तेल असो, जर ते पुन्हा पुन्हा गरम केलं तर त्याचे फायदे नाहीसे होतात आणि ते तेल आरोग्यास घातक ठरतं. असं तेल खाल्ल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन अडथळे निर्माण होतात.