मध्य रेल्वेवर तीन दिवसीय ब्लॉक

लोणावळा- मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेवर तीन दिवसीय ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा – मळवली विभागात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ४ स्टील्स उभारणीसाठी, समांतर रेल्वे फाटकाच्या (लेव्हल क्राॅसिंग गेट) जागी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मळवली – लोणावळा दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. ब्लाॅक काळात रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here