मुंबईत तीन तासांचा रेड अलर्ट!

दोन दिवसांच्या विश्रांंतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सुरु झाला आहे. मुंबईतही दुपारपासून मुसळधार पावासाला सुरुवात झाली. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईचा वाहतूकीचा वेग मंदावला आहे. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसाठी पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.१२ ते १३ जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज राज्यातील घाट परिसरात पाऊस पडेल. तर, मुंबईत आज तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here