मुंबई विमानतळावरून आयसीस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य असलेल्या दोन फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने ही कारवाई केली आहे. हे दोन्ही दहशतवादी मागील दोन वर्षांपासून फरार होते. राष्ट्रीय तपास संस्थेने २०२३ मध्ये महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या या दोघांना अटक केली आहे.
अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नाव आहे. या दोघांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-2 टर्मिनसवर इमिग्रेशन ब्युरोने जकार्ता, इंडोनेशिया येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली आहे.