विदर्भामधून ठाकरे गटाला मोठा धक्का!

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ते नुकतेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आले होते. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईतच त्यांचा प्रवेश होणार आहे. रवींद्र शिंदे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर यापूर्वी चार वेळा संचालक म्हणून निवडून आले असून, बँकेच्या राजकारणात त्यांची ओळख ‘किंगमेकर’ अशी आहे. 

यंदा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 21 संचालकांपैकी 9 जागांवर भाजप समर्थक उमेदवार निवडून आले आहेत. बँकेच्या इतिहासात भाजपसाठी ही पहिलीच एवढ्या मोठ्या प्रमाणावरची कामगिरी आहे. त्यामुळेच, शिंदेंच्या राजकीय ताकदीची आणि बँकेत त्यांच्या प्रभावाची दखल घेऊन भाजपकडून त्यांना अध्यक्षपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये भाजप आमदार बंटी भांगडिया यांची खेळी निर्णायक ठरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बँकेवर आपली ताकद वाढवली असून पहिल्यांदाच जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा अध्यक्ष बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्याकडे स्वतःचे 4 ते 5 संचालक असल्याने त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here