भाजपचे जहाज ओव्हरलोड, लवकरच बुडणार: उद्धव ठाकरे

काश्मीर आपले आहे.काश्मीर हे कालही आपले होते आणि आज पण आपलं आहे उद्याही आपलं राहील, असे विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्भूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरु आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवनमध्ये नुकतीच बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका समोर ठेवून ठाकरे गटातील नेत्यांना महाराष्ट्रभर दौरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारला टोला लगावला.आमचे जहाज बुडणारे नाही.तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे. अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि शिंदेंच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दु:ख नाही करायचे. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट, प्रयत्न करायचे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here