रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने संदर्भात एक मोठा दावा केला आहे. ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही’, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
“एक काळ असा होता की जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आणि भारतीय जनता पार्टीकडून मी एकटाच आमदार होतो. मात्र, आज काळ असा आहे की भारतीय जनता पक्षाचे ३ आमदार आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं कोणी आहे का? म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पण त्यांच्या वागण्यामुळे आणि व्यवहारामुळे लोक त्यांच्या विचारापासून दूर गेले. त्यामुळे काँग्रेस जवळपास संपुष्टात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) संपली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.