उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. अंधेरी पूर्व येथील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांचा शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश पार पडला. मात्र संदीप देशपांडे यांनी पक्षप्रवेश घेतलेला हा आमचा पदाधिकारी नाही असं स्पष्ट केलं आहे. २०१४ ला पदाधिकारी होता, त्याची हकालपट्टी केलेली आहे असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात. मनसेचा पदाधिकारी फोडून आणला आहे. आणि त्याला प्रवेश करतोय हे बरं वाटावं म्हणून. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून फेरतपासणी करावी. पक्षप्रवेश घेतलेला हा आमचा पदाधिकारी नाही. २०१४ ला पदाधिकारी होता, त्याची हकालपट्टी केलेली आहे. तेव्हापासून ना तो आमच्या बॅनरवर आहे, ना पदावर आहे. हा बदनाम व्यक्ती आहे. त्याच्यावर ३५४ सारखे केसेस आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.