वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट समोर आला आहे. वैष्णवी हगवणेनं १६ मे रोजी आत्महत्या केल्यानंतर तिच्यावर १७ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या रिमांड कॉपीत हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या रिमांड कॉपीत वैष्णवीचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रिमांड कॉपीत पोलिसांनी ११ मुद्दे नमूद केले आहेत. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेगळी दिशा मिळणार आहे. तसेच या प्रकरणात नव उलगडा होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.