वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसंच आमच्याकडे इतकी संपत्ती, गाड्या असताना हुंड्यासाठी छळ का करु? अशी विचारणा करत आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. मात्र वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी थेट पावत्या दाखवत हगवणे कुटुंबाचा खोटारडेपणा उघड पाडला आहे. माझ्याकडे सोनं, चांदी, गाडी, गौरीची मागणी केली होती. तसंच फॉर्च्यूनर गाडीसाठी हगवणेंनी आग्रह धरला होता असे अनेक खुलासे त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.
“माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला असं म्हणत आहेत. मीच तिला आणि आरोपीला १ लाख ५२ हजारांचा मोबाईल दोन-तीन महिन्यापूर्वी घेऊन दिला होता. माझी मुलगी माझ्या घरी होती. वाकडच्या क्रोमात तिला बोलावून घेतलं होतं. मला पप्पाकडून मोबाईल घेऊन दे असं सांगितलं. मुलीने मला फोन केला, त्याचा रेकॉर्डही आहे. १८-९-२०२४ ला मोबाईल घेऊन दिला होता. त्याचे आजही हफ्ते भरत आहेत,” असा खुलासा अनिल कस्पटे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “मी एमजी हेक्टर गाडी बूक केली होती. वाकड हायवे शोरुमला गाडी बूक केली होती. ५० हजार डिपॉझिट भरंल होतं. त्यांनी त्यावरुनही माझ्याशी वाद घातला. ही जर गाडी दिली तर ती गाडी सोडून देईन नाहीतर पेटवून देईन, मला फॉर्च्यूनर गाडीच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं”. त्याचीही पावती यावेळी त्यांनी दाखवली.