वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण, धस यांचा नवा दावा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांनी दोन गटांमध्ये तुरुंगात राडा झाल्याचा दावा केला आहे. त्यात वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला महादेव गिते व अक्षय आठवले यांच्या टोळीकडून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने अशी कोणतीही मारहाण झाली नसल्याची भूमिका मांडली आहे.

फोन करण्यावरून दोन टोळ्यांमध्ये राडा झाला आणि त्यातून वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी यावेळी केला आहे. ते म्हणाले, “दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याचं मला समजलंय. प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगत आहे. पण हा वाद मुख्य दोन टोळ्यांमध्ये झालाय. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं. माझी तर माहिती आहे की आकांना स्वतंत्र जेवणही दिलं जातंय. एक स्पेशल फोन आहे ज्यावरून आकांचं थेट कनेक्शन परळीतल्या कोणत्यातरी फोनशी होतं ही माहिती मला मिळाली आहे”, असं सुरेश धस पत्रकार परिषदेत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here