‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र विकी कौशलचं कौतुक सुरू आहे. सगळीकडे सुरू असलेला कौतुकसोहळा पाहून विकीच्या कुटुंबीयांनी त्याची नजर काढली आहे. याचा गोड व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विकीची आया असलेल्या, विकीला लहानपणापासून सांभाळणाऱ्या आशाताईंनी विकिची नजर काढली आहे.
विकी कौशल लिहितो, “आशा ताईंनी मला उंचीने आणि आयुष्यात मोठं होताना पाहिलेलं आहे. कालच त्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्या म्हणाल्या, उभे राहा, नजर काढायची आहे तुमची… ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्या नेहमीच माझी काळजी करत असतात. माझ्या आयुष्यात त्या आहेत याचा मला खरंच खूप आनंद आहे.”
विकीच्या व्हिडीओवर ‘छावा’मध्ये कान्होजीची भूमिका साकारणाऱ्या सुव्रत जोशीने “इडा पीडा टळो हे किती गोड आहे” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अभिनेत्याच्या चाहत्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “विकीला खरंच कोणाची नजर लागू नये”, “नो नजर प्लीज”, “जस्ट pure लव्ह”, “या काकूंनी अगदी बरोबर केलंय”, “टचवूड”, “सिनेमा ब्लॉकबस्टर झालाय…हे गरजेचं होतं” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.