सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेक जुनी गाणी ट्रेंड होत आहेत. “खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली काल बाई सुपारी फुटली” या गाण्यावर सुंदर असे एक्स्प्रेशन्स देत विद्या बालनने डान्स केला आहे.
सुंदर अशी ऑरेंज रंगाची साडी, कानात मोठे कानातले आणि कपाळावर चंद्रकोर टिकली अशा मराठमोळ्या अंदाजात विद्या बालान ‘नवरी नटली, सुपारी फुटली’ या गाण्यावर थिरकली आहे. तिचे कमाल एक्स्प्रेशन्स पाहून चाहते सुद्धा भारावून गेले आहेत.
विद्या बालनच्या व्हिडीओवर, “अगं बाई किती सुंदर” अशी कमेंट अभिनेत्री क्रांती रेडकरने केली आहे. तर अमृता खानविलकर, स्वाती देवल, खुशबू उपाध्याय या अभिनेत्रींनी कमेंट्स करत विद्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, विद्याच्या या डान्स व्हिडीओला एक दिवसाच्या आत तब्बल १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.