पवईतील ‘एल अँड टी’ (L&T) कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने “मराठी गया तेल लगाने!” असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केला. या घटनेनंतर संतापलेल्या मनसैनिकांनी त्याला कानाखाली लगावत आणि खडे बोल सुनवत माफी मागायला लावली. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या या सुरक्षा रक्षकाला मनसेने त्यांच्या स्टाईलने धडा शिकवला.
व्हिडीओत नेमका काय संवाद?
मनसैनिक : काय बोलतोय तू?
सुरक्षा रक्षक: जो पुछा वो बताने के लिये
मनसैनिक : तू मराठीत बोल, मराठीत का बोलत नाहीये?
सुरक्षा रक्षक : मराठी मेरे को आता नहीं. मै क्यूँ बोलू
मनसैनिक : तुला मराठी बोलावं लागेल
सुरक्षा रक्षक : मराठी, मराठी मुझे आती नहीं.
मनसैनिक : बोल माझ्याशी मराठीत, मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल
सुरक्षा रक्षक : मेरे को मराठी आता नहीं.
मनसैनिक : तो सिख फिर, तू शिक मराठी, मला सांगू नको.
सुरक्षा रक्षक : क्यूँ जरुरी है क्या?
मनसैनिक : क्यूँ जरुरी मतलब? मराठी जरुरी नाही?
सुरक्षा रक्षक : मराठी गया तेल लगाने, मेर को मत बताओ तुम.
मनसैनिक : मराठी गेलं तेल लावायला? तुला दाखवतो मी मराठीची औकाद काय असते. मराठी गेलं तेल लावायला म्हणालास ना?
सुरक्षा रक्षक : ये मेरेको गाली दे रहा है..
दुसरा सुरक्षा रक्षक : काय झालं? जाऊ द्या जाऊद्या..
मराठी भाषेविरोधात मुजोरी दाखवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी कानशिलात लगावली. यानंतर मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला घेराव घातला. तू किती वर्षे मुंबईत राहतो आहे? सुरक्षा रक्षक म्हणाला चार वर्षे. यानंतर मनसैनिकांनी त्याच्याकडून माफी मागून घेतली ती अशी. “मी मराठीचा अपमान केला त्याबद्दल राज ठाकरेंची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, मराठी माणसांचीही माफी मागतो. यापुढे मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन.” असं म्हणत मुजोरी दाखवणाऱ्या सुरक्षा रक्षकाने माफी मागितली.