हायटल हर्निया ही एक अशी स्थिती आहे ज्यात पोटाचा काही भाग अन्ननलिकेच्या समोरील बाजूला छातीतमध्ये ढकलला जातो, तेव्हा या प्रकारचा हर्निया होऊ शकतो. यामध्ये पोटाचा भाग हा छातीच्या पिंजऱ्यातून डायाफ्रामच्या माध्यमातून निघतो. वाढत्या वयानुसार हायटल हर्निया होण्याची शक्यता वाढते. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५५ ते ६० टक्के व्यक्ती हायटस हर्नियाने ग्रस्त असल्याचे दिसून येते. याची लक्षणे काय आहेत जाणून घेऊया
बहुतेक हायटल हर्निया लहान असताना त्याची कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र मोठ्या हायटल हर्नियामध्ये खालील लक्षणे आढळतात:
ढेकर येणे, उलट्या होणे
छातीत जळजळ आणि अॅसिड रिफ्लक्स
पोट किंवा छातीत दुखणे
गिळण्यास त्रास होणे
खूप पोट भरल्यासारखे वाटणे, विशेषतः जेवणानंतर
काळ्या रंगाचा मल येणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे, जे कधीकधी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे लक्षण असते
जुनाट खोकला आणि दम्यासारखी लक्षणे
आवाजात बदल होणे