शरीरात जर कॅफिनचं प्रमाण जास्त असेल, तर तुमचं बॉडी मास इंडेक्स (BMI) कमी होऊ शकतं आणि टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका देखील वाढू शकतो. असं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे. हे संशोधन कारोलिंस्का इंस्टिट्यूट (स्वीडन), ब्रिस्टल विद्यापीठ (UK) आणि इंपीरियल कॉलेज लंडन येथील वैज्ञानिकांनी एकत्रितपणे केलं आहे. ज्या लोकांवर हा प्रयोग करण्यात आला त्यांच्यात फॅट मास आणि BMI दोन्ही कमी असल्याचं निदर्शनास आलं.
शास्त्रज्ञांनी या अभ्यासातून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की कॅफिन आपल्या शरीरावर काय परिणाम करतो. त्यांना असं आढळलं की कॅफिन ऊर्जा वाढवतं, चरबी कमी करतं आणि भूक कमी करते. याचा प्रभाव टाइप-2 डायबिटीजवरही दिसतो आणि यापैकी जवळपास अर्धा परिणाम BMI कमी झाल्यामुळे होतो.
रिसर्चनुसार, ज्या लोकांच्या शरिरात नैसर्गिक रित्या कॅफीन जास्त प्रमाणात असतात. त्यांच्या शरीरात फॅटचं प्रमाण आणि BMI कमी असतो. त्यामुळे हे दिसून येते की कॅफीनमुळे फक्त उर्जा वाढत नाही तर त्यासोबत चर्बी कमी होण्यास देखील मदत होते.