मुंबई पालिका निवडणुच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. यावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातून शिवसेना आणि ठाकरे बंधू हे नाव संपवायचे आहे. यासाठी दोघे एकत्र आले तर याबद्दल मी स्वत: सकारात्मक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी आपले मतभेद बाजुला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडी ही आमची राज्यासाठी राजकीय व्यवस्था असल्याचे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे आम्हाला सध्या एसंशी आणि फडणवीसांसोबत दिसतायत. जे आम्हाला योग्य वाटत नाही. माझी उद्धव ठाकरेंची सविस्तर चर्चा झाली. आम्ही हवेत बोलत नाही. राज ठाकरेंकडून भूमिका आली असेल तर ही नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. सर्व ठाकरे एक आहोत. तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रुंना घरी घेतलं, हा आमच्यासाठी न पटणारा विषय आहे. दोन ठाकरे एकत्र आले तरी त्यांच्यासोबत लोकभावना असल्याचेही संजय राऊत म्हणाले.